पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक शाळेत तासिका तत्वावर विद्यार्थ्यांना धडे देणाऱ्या शिक्षकांना 54 रुपये प्रतितास प्रमाणे मानधन दिले जाते. पुणे महापालिकेच्या धर्तीवर त्यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी नगरसेवक कैलास बारणे यांनी केली होती. त्यावर स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनी बारणे यांच्या मागणीच्या प्रस्तावाला बुधवारी (दि. 8) बैठकीत मान्यता दिली.
No comments:
Post a Comment