Friday, 10 November 2017

रुग्णांचा गोपनीय “डाटा’ ठेकेदाराकडे कसा?

– “हेल्थ कार्ड’च्या थेट कामाचा प्रस्ताव फेटाळला

पिंपरी – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात “हेल्थ कार्ड मॅनेजमेंट सिस्टीम’ राबविण्यात आली. “हेल्थ कार्ड’ सेवा पुरविणाऱ्या अमृता टेक्‍नॉलॉजी संस्थेने रुग्णांचा गोपनीय “डाटा’ पालिकेला न देता अद्याप स्वतःकडे राखून ठेवला आहे. संबंधित ठेकेदाराचे “ऑपरेटर’ उपलब्ध नसतील, तर “हेल्थ कार्ड’ सेवा विस्कळीत होते. पालिकेने “हेल्थ कार्ड’बाबत स्वतःची यंत्रणा तयार न केल्याने संबंधित संस्था शिरजोर बनली आहे. त्यामुळे “हेल्थ कार्ड’चा देखभाल-दुरुस्तीची निविदा न काढता हे काम थेट पध्दतीने देण्याचा प्रस्ताव बुधवारी (दि.8) स्थायी समितीने फेटाळला आहे. तसेच “हेल्थ कार्ड’मुळे आरोग्य सेवा विस्कळीत होवू नये, यासाठी त्या ठेकेदारास अजून तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. तोपर्यंत संगणक विभागाने स्वतःचे सॉप्टवेअर बनवून सर्व “डाटा’ संस्थेकडून घ्यावा, असे आदेश स्थायी समितीने दिले आहे.

No comments:

Post a Comment