पिंपरी – इंद्रायणीनगर सेक्टर क्रमांक 1 मधील महाराष्ट्र कॉलनी शेजारील मोकळ्या भूखंड क्रमांक 3 मध्ये पोहण्याचा जलतरण तलाव बांधण्याचा घाट घालण्यात येत आहे. याबाबतचा प्रस्ताव उद्या (गुरुवारी) होणाऱ्या स्थायी समितीसमोर ऐनवेळी दाखल करण्यात आला आहे. मात्र, भोसरी, नेहरुनगर आणि संभाजीनगर परिसरात क्रीडा विभागाचे जलतरण तलाव उपलब्ध असताना पुन्हा इंद्रायणीनगरमध्ये जलतरण तलाव बांधणार का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
No comments:
Post a Comment