भाजपने पिंपरी चिंचवड महापालिकेत प्रथमच सत्ता स्थापन केल्यानंतर शहरातील विकासकामांना “अच्छे दिन” आले आहेत. गेल्या दोन आर्थिक वर्षांच्यातुलनेत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यात विकासकामांवर सर्वाधिक खर्च करून भाजपने बाजी मारली आहे. महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना २०१५-१६या आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत भांडवली कामांवर अर्थसंकल्पात एकूण तरतूद रक्कमेपैकी २९.२३ टक्के रक्कम खर्च झाले होते. २०१६-१७ या आर्थिक वर्षात याच कालवाधीत भांडवली कामांवर २१.२० टक्के रक्कम खर्च करण्यात आले होते. भाजपची सत्ता आल्यानंतर २०१७-१८ या आर्थिक वर्षातपहिल्या आठ महिन्यांत भांडवली कामांवर ३४.७९ टक्के रक्कम खर्च झाले आहे.
No comments:
Post a Comment