पुणे - रिंगरोडच्या सर्वेक्षणासाठी ड्रोन कॅमेरा वापरण्यास परवानगी देणे आणि त्यासाठी पोलिस बंदोबस्त पुरविण्याला अखेर ग्रामीण पोलिसांनी मान्यता दिल्याने रखडलेले सर्वेक्षणाचे काम मार्गी लागण्याची शक्यता आहे. ही मान्यता मिळविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) तब्बल आठ महिने प्रतीक्षा करावी लागली.

No comments:
Post a Comment