Wednesday, 27 December 2017

अस्वच्छतेने जिल्हा रुग्णालयातील रुग्ण त्रस्त

पिंपरी – नवी सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे; परंतु रुग्णालयातील स्वच्छता गृहांची दूरवस्था, पिण्याच्या पाण्याचे कुलर अपुरे, रुग्णांचे बेडशीटची दुर्गंधी यासह अनेक गैरसोयीमुळे रुग्णांसह नातेवाईक त्रस्त झाले आहेत. याकडे जिल्हा शल्य चिकित्सकांनी दुर्लक्ष केले आहे. सुमारे 300 बेडचे रुग्णालय आहे. बाह्यरुग्ण विभागात दररोज 800 ते 100 रुग्ण उपचारास घेण्यास येतात, मात्र रुग्णालयातील विविध विभागातील सोयी-सुविधांची वानवा, पिण्याच्या पाण्याची गैरसोय, बेडवरील गादी, बेडशीटची दुर्गंधी अशा अनेक प्रकारच्या गैरसोयी आहेत.

No comments:

Post a Comment