पिंपरी – महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागातून महिलांना स्वयंरोजगारासाठी शिवणयंत्र, मागासवर्गीय मुला-मुलींना मोफत सायकल आणि महिलांना स्वयंरोजगारातून त्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी मोफत ड्रायव्हींग प्रशिक्षण देणाऱ्या योजना राबविण्यात येत आहेत. परंतु, शिवणयंत्र व मोफत सायकल वाटप योजनेत थेट अर्थसहाय्य दिले जात आहे. त्या योजनांच्या अटी व शर्थीमुळे लाभार्थ्यांना लाभ मिळणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे योजनांच्या अटी व शर्तीत बदल करण्याचा निर्णय महिला व बालकल्याण समिती घेणार असून त्यात दुरुस्तीचा ठराव मांडण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment