पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशी कचरा डेपोत ‘वेस्ट टू एनर्जी’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारला जात आहे. घरोघरीचा कचरा जमा करून तो मोशी डेपोत टाकण्याची व संबंधित प्रकल्पासाठी एकच ठेकेदार असल्याने दोन्हीसाठी वेगवेगळा दर देऊन पालिकेचे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थायी समिती सदस्य मोरेश्वर भोंडवे व वैशाली काळभोर यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे मंगळवारी (दि. 27) केला आहे. या संदर्भात बुधवारी (दि. 28) होणार्या स्थायी समिती सभेत आवश्यक कागदपत्रांसह सविस्तर खुलासा करावा; अन्यथा सदर विषय तहकूब करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment