पिंपरीमध्ये वाहतूक व्यवस्थेच्या बाबतीत नेहमीच वाहतूक पोलिसांवर टीका होते. पिंपरी कॅम्पातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पिंपरी पोलिसांना वारंवार कारवाई करूनदेखील वाहतूक कोंडी सोडवण्यात अपयश येते. मात्र, पिंपरी पोलिसांनी पेंडिंग केसच्या कारवाईमध्ये जोरदार वसुली केली आहे. सीसीटीव्ही कॅमेर्यांद्वारे केलेल्या कारवाईमध्ये पेंडिंग दंड वाहतूक पोलिसांनी वसूल केला. पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या या कारवाईमध्ये साडेतीन लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.
No comments:
Post a Comment