पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता नेत्यांच्या कामगिरीमुळे आली हे जरी सत्य असले तरी त्यात सोशल मीडियाचा मोठा वाटा होता. ‘नको भानामती, नको बारामती’ असे म्हणत भाजपने सोशल मीडियावर निवडणुकीपूर्वी धुमाकूळ घातला होता. पण त्याच भाजपला आता राष्ट्रवादीने त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायचे ठरवले आहे. म्हणूनच भाजपच्या ‘पारदर्शक’ कारभारावर नेमक्या शब्दात घाव घालण्यासाठी राष्ट्रवादीने सोशल मिडियावर टिका करणारी पोस्ट व्हायरल करायला सुरुवात केलीय आहे. यात शहरातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तोंडावर फुल्या मारत भाजपच्या ‘पारदर्शक’ कारभाराचे वाभाडे काढत शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांविरोधात ‘रणशिंग’ फुंकले आहे.
No comments:
Post a Comment