पिंपरी : पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यात यावी, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे. या संदर्भात पिंपरी-चिंचवड सिटीजन फोरम (पीसीसीएफ) या संघटनेच्या पदाधिकाºयांनी मुख्यमंत्र्यांची नुकतीच भेट घेतली. ''पहिल्या टप्प्यातच निगडीपर्यंत मेट्रो धावण्यासाठी प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेण्यात आली आहे. मेट्रोचे काम पिंपरीपर्यंत वेगात सुरू आहे. त्याच वेगात निगडीपर्यंतच्या मेट्रोचे काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.


No comments:
Post a Comment