Friday, 16 February 2018

“खासगी हॉस्पिटल नियंत्रण’ कायदा लवकरच अंमलात

राज्य सरकारची न्यायालयात माहिती 
मुंबई – वैद्यकिय बिल भरण्यास असमर्थ असणाऱ्या रूग्णाला डिस्चार्ज न देण अथवा निधन झालेल्या रूग्णाचा मृतदेह देण्यास नकार देणे, असे प्रकार वारंवार घडत असल्याने राज्यभरातील सर्व खासगी हॉस्पिटलवर नियंत्रण आणण्यासाठी लवकरच कायदा अंमलात आणला जाणार असल्याची माहिती राज्य सरकारने आज न्यायालयात दिली.
याबाबत मेडिकल क्षेत्रातील जाणकार व्यक्तिंशी चर्चा सुरू असून क्‍लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्‍ट अंतर्गत या नव्या कायद्याचा मसूदा तयार झाला असल्याचेही स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment