‘पीएमपी’साठी अत्यंत कडक शिस्तीचे लाभलेले अध्यक्ष तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर पीएमपीची स्थिती अत्यंत भयावह झालेली दिसून येत आहे. मुंढे यांनी ब्रेकडाउनचे प्रमाण कमी केले होते. तर प्रवासी संख्यासुद्धा वाढली होती. आता मात्र एका महिन्यातच विविध मार्गांवरील बसची संख्या घटली आहेच, शिवाय प्रवाशांची संख्यासुद्धा कमी झाली आहे. परिणामी पीएमपीच्या उत्पन्नात रोज सुमारे दहा लाख रुपयांचा तोटा होऊ लागला आहे. तसेच रोजच्या प्रवाशांची संख्या सुमारे 80 हजाराने घटली आहे. दरम्यान मनमानी करण्यास कर्मचार्यांना मोकळे रान मिळाले असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.
No comments:
Post a Comment