Wednesday, 28 March 2018

तहकुबीचे “ग्रहण’ सुटले: अर्थसंकल्पाची चिरफाड

पिंपरी- तहकुबीचे ग्रहण लागलेला पिंपरी-चिंचवड महापालिकेचा आगामी 2018-19 आर्थिक वर्षाचा 5 हजार 262 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प अखेर मंगळवारी (दि.27) मंजूर करण्यात झाला. सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी केलेल्या तब्बल 1 हजार 112 उपसूचनांपैकी ग्राह्य ठरलेल्या 981 उपसूचनांसह हा अर्थसंकल्प मंजूर झाला. मात्र, उपसूचनांमुळे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाची पुरती चिरफाड करण्यात आली. तसेच, विकासकामांच्या नियोजनावर पाणी फेरले गेल्याने महापालिका प्रशासन तोंडघशी पडले आहे.

No comments:

Post a Comment