पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात अवकाळी पावसाच्या हलक्या सरींनी आज (शुक्रवारी) हजेरी लावली.
यंदा जोरदार पाऊस, कडाक्याची थंडी अनुभवायला मिळाली. उन्हाळाही वेळेवरच सुरु झाला. सुरुवातीलाच सूर्य आग ओकू लागल्याचे चित्र होते. मात्र, मागील चार दिवसांपासून ढगाळ स्वरुपाचे वातावरण निर्माण झाल्याने अवकाळी पावसाची चाहुल लागली होती. दरम्यान काल (गुरुवारी) सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास शहरातील काही भागामध्ये हलकासा शिडकाव केला.
No comments:
Post a Comment