पत्रसंवाद
पुणे बार असोसिएशनने मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ पुण्यात व्हावे यासाठी एक दिवसाचा न्यायालयाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. हे योग्यच होते. यापूर्वीही बेमुदत संप केलेला होता. तब्बल 40 वर्षांपूर्वी विधिमंडळात खंडपीठाला मंजुरी मिळूनही ते अद्याप सुरू न होणे ही एक दुर्दैवी बाब म्हणावी लागेल. पुण्यात प्रलंबित अपिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने त्याचा लवकर निपटारा व्हावा असे सगळ्यांनाच वाटते. मुंबईसह औरंगाबाद, नागपूर येथे खंडपीठे आहेत. आता कोल्हापूरलाही होत आहे. पुण्यात खंडपीठ होण्यासाठी अनेक संस्था, संघटना व राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे. राज्य सरकार आणि उच्च न्यायालयाने याबाबत लवकरात लवकर ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment