बारामती : पॅथॉलॉजी या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले तसेच मेडीकल कौन्सिलकडे नोंदणीकृत डॉक्टरच फक्त लॅबोरेटरी रिपोर्ट प्रमाणित करु शकतात असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर या पुढील काळात जे डॉक्टर्स रुग्णांना इतर अर्हताधारकांकडे पाठवतील अशा डॉक्टरांविरुध्द मेडीकल कौन्सिलकडे तक्रार करणार असल्याचे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टीसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबॉयोलॉजिस्ट संघटनेने आज स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment