चौफेर न्यूज – पिंपरी- चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक 17 मधील बिजलीनगर उड्डाणपुलाजवळून अंडरपास बांधण्यात येणार आहे. सोमवार दि. 5 मार्च रोजी सकाळी 10 वाजता चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते या विकास कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे, अशी माहिती नगरसेवक नामदेवराव ढाके यांनी दिली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर नितीनआप्पा काळजे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमाताई सावळे, ब प्रभाग अध्यक्ष सचिन चिंचवडे, नगरसेवक नामदेवराव ढाके, नगरसेविका करुणाताई चिंचवडे, मोनाताई कुलकर्णी यांच्या उपस्थितीत भूमीपूजनाचा कार्यक्रम होईल. या अंडरपासच्या कामासाठी 13 कोटी 21 लाख 84 हजार 190 रुपये खर्च येणार असून हे काम कृष्णाई इन्फ्रा.प्रा.लि.कंपनीस देण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment