पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या चाव्या कोणाच्या हातात जाणार यावरून बरेच नाट्य घडले. अनेक घडोमोडी घडल्या, नव्या जुन्यांचा वाद झाला, दबावतंत्र वापरण्यात आले. अखेरीस भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी यशस्वी राजकीय खेळी करत त्यांचे समर्थक ममता गायकवाड यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करून घेतली आहे. गायकवाड यांचा स्थायीच्या अध्यक्ष पदाचा अर्ज दाखल करण्यासाठी स्वत: आमदार जगताप महापालिकेत आले असून त्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला आहे.
No comments:
Post a Comment