पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदासाठी विलास मडीगेरी , शीतल शिंदे , राहुल जाधव यांची नावे स्पर्धेत असताना भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी आपल्या समर्थक ममता गायकवाड यांना संधी देऊन एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. लोकसभा ,विधानसभा तोंडावर असताना आपले ऐकणार्या व्यक्तीच्या हाती पालिका तिजोरीच्या चाव्या राहाव्यात अशी खेळी केली. मडीगेरी यांच्या पाठीशी ताकद उभी करणार्या जुन्यांना आपल्या कृतीने ताकद दाखवून दिली. खासदार श्रीरंग बारणे यांनी दोनच दिवसांपूर्वी भाजपच्या जितेंद्र ननावरे यांचा सेनेत प्रवेश घडवून आणला होता. मागासवर्गीय महिलेला सलग दुसर्या वर्षी स्थायी अध्यक्षपदी संधी देऊन आमदार जगताप यांनी बारणे यांना मात दिली आहे.
No comments:
Post a Comment