राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची सर्व नागरिकांना बरोबर घेऊन काम करण्याची भूमिका आहे. मात्र, आदरणीय लोकनेते शरद पवार यांचे विचार लोकांपर्यंत पोहचविण्याबाबत कार्यकर्ते कमी पडले. विरोधकांच्या खोट्या भूलथापा व आश्वासनांना मतदार भुलले. त्यामुळे राष्ट्रवादीला सत्ता गमवावी लागली. पुढील काळात खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांसह जास्तीत जास्त नागरिकांना सोशल मिडीया वापरण्याबाबत जनजागृती शिबीरे आयोजित करण्यात येतील. त्याचा लाभ घ्यावा व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे विचार सोशल मिडीयासारख्या प्रभावी व जलद माध्यमातून घरोघरी पोहचवावेत असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केले.
No comments:
Post a Comment