दारूचे घोट रिचवणे, सिगारेटचे झुरके घेणे हे महाविद्यालयीन तरुणांचे ‘स्टेटस सिम्बॉल’ बनत असताना हीच नकारात्मक क्रेझ शाळकरी अल्पवयीन मुलांमध्येही वाढत आहे. पुण्याच्या मध्यवस्तीतील काही नामांकित शाळांत शिकणार्या 40 ते 45 मुलांच्या दप्तरात ‘इलेक्ट्रॉनिक्स सिगारेट’ अर्थात मोबाईल हुक्का (ई-सिगारेट) सापडल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे धूम्रपानाचा आधुनिक प्रकार असलेल्या या ई-सिगारेट्स टपर्या, स्टेशनरी दुकाने आणि ऑनलाईन पद्धतीने सहजरीत्या उपलब्ध होत आहेत. शाळकरी मुले व्यसन म्हणून नव्हे तर ‘फॅशन’ म्हणून या ई-सिगारेटचे झुरके घेत आहेत, हे लक्षात आल्यावर शाळा प्रशासन व संबंधित पालकांनी व्यसनमुक्ती केंद्राकडे धाव घेतली आहे.

No comments:
Post a Comment