Monday, 5 March 2018

“माझ्या पक्षाचं नाव दमदार आमदार महेश लांडगे”, सोशल मिडियावर समर्थकांकडून ‘असंतोष’ व्यक्त!

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप समर्थक ममता गायकवाड यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केली. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे निकटवर्तीय राहुल जाधव यांना डावलून ही निवड करण्यात आली. या निवडीवरून सत्तेत असलेल्या भाजपमध्ये प्रचंड नाराजीनाट्य घडले. लांडगे समर्थक असलेल्या महापौर नितीन काळजे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. तर राहुल जाधव यांनी थेट स्थायीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. स्थायीच्या अध्यक्षपदी राहुल जाधव हे प्रबळ दावेदार असताना झालेल्या या घडामोडीमुळे लांडगे समर्थकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. सोशल मिडीयावरून समर्थकांनी सत्ताधारी भाजपच्या कार्यपध्दतीवर टिका करत महेश लांडगेंची जोरदार पाठराखण केली आहे.

No comments:

Post a Comment