नुकतीच अंधश्रद्धेमुळे एका प्रथितयश रुग्णालयात एका महिलेचा बळी गेल्याची घटना ताजी असताना पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिराचे कामही अंधश्रद्धेमुळेच रखडल्याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे. एका अंधार्या कोपर्यात मजुरांना महिलेने हाक मारली असल्याचा भास होत असल्याचे कामगारांनी सांगितले असून, या भीतीपोटी मजूर काम करण्यास तयार नाहीत. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून सुरू असलेले रंगमंदिराचे काम सध्या रखडत रखडतच सुरू आहे.

No comments:
Post a Comment