- सोळा कोटी थकीत ः कर संकलन विभागाचे कामकाज ढिसाळ
पिंपरी, (प्रतिनिधी) – बाजारात आर्थिक मंदी असताना पालिकेची आर्थिक घडी शाबूत ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासनाकडून समाधानकारक काम होताना दिसत नाही. कारण, दिवसभरात खाद्य पदार्थ विक्रीद्वारे दहा लाखांहून अधिक गल्ला करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांकडे चालू वर्षातील मागणीसह थकबाकी अशी एकूम तब्बल 16 कोटी 16 लाख एवढ्या मिळकत कराची वसुली रखडली आहे. मिळकत कर थकीत ठेवणाऱ्या 221 हॉटेल व्यावसायिकांवर अद्याप पालिकेने कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा मिळकत कर थकित राहिला आहे.
No comments:
Post a Comment