पिंपरी - पंधरा वर्षांत संपूर्ण परिसर विकसित होतो. शेकडोंच्या संख्येने बांधकामे उभारली जातात. मोठी व्यावसायिक संकुले तयार होतात. मात्र, अवघ्या एक ते दीड किलोमीटर रस्ता होऊ शकत नाही? शहराच्या विकास आराखड्यात असलेला रस्ता अस्तित्वात आला नसतानाही शेकडो सदनिका असलेल्या बांधकामाला परवानगी कोणत्या आधारे दिली जाते? केवळ परवानगीच नाही, तर बांधकाम पूर्ण होऊन त्याला पूर्णत्वाचा दाखलाही मिळतो. महापालिकेच्या अजब कारभाराबाबत आज पिंपळे सौदागरमधील शेकडो रहिवासी असे अनेक प्रश्न विचारत आहेत.
No comments:
Post a Comment