भोसरी - पॉस यंत्रातील त्रुटी बरोबरच अन्य कारणांमुळे भोसरीतील पाच रेशनदुकानदारांनी आपली दुकाने बंद केली आहेत. पॉस यंत्रातील त्रुटी त्वरित दूर न केल्यास आणखी काही दुकाने महिनाअखेरीपर्यंत बंद होण्याची शक्यता रेशन दुकानदारांच्या संघटनेने वर्तविली आहे. दरम्यान, बंद होणाऱ्या दुकानांमुळे अन्य दुकानांकडील ग्राहकांची संख्या वाढत आहे. त्याचा परिणाम धान्य वितरणावर होत असून, त्यामुळे तारांबळ उडत आहे. तरी ही समस्या दूर करण्याची मागणी शिधापत्रिकाधारकांमधून होत आहे.

No comments:
Post a Comment