पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्तेत येण्यापूर्वी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी शहरवासियांना विविध आश्वासने दिली होती. शास्तीकर, अनधिकृत बांधकामे, बोपखेल, संरक्षण विभागाचे प्रलंबित प्रश्न सोडू अशा वल्गना केल्या होत्या. महिन्यातून एखदा शहरात येऊन नागरिकांचे प्रश्न जाणून घेणार असे सांगितले होते. तथापि, वर्षभराच्या राजवटीत पालकमंत्र्यांनी शहराकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. शहराचा एकही प्रश्न मार्गी लागला नाही. शहराच्या प्रश्नांसाठी बैठका होत नाहीत. महापालिकेच्या विविध कार्यक्रमांसाठी बापटांचे पत्रिकेत नाव असते. मात्र, ते हजर राहात नाहीत. त्यामुळे बापटांना पिंपरी चिंचवडची अॅलर्जी आहे का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी उपस्थित केला आहे. माजी उपमुख्यमंत्री व पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री अजित पवार महिन्यातून एक ते दोन वेळा शहरात येत होते. समस्या जाणून घेत होते. प्रश्न त्वरित मार्गी लागले जात होते. परंतु, आता तसे होताना दिसत नाही, असेही ते म्हणाले.
No comments:
Post a Comment