मोबाइल फोनमुळे संचार क्रांती झाली हे खरे; परंतु जगाच्या लोकसंख्येपेक्षा अधिक मोबाइलची संख्या असेल, तर ते मात्र अत्यंत घातक लक्षण मानायला हवे. नवीन मॉडेल आल्यानंतर जुने मोबाइल कचऱ्यात जातात. याखेरीज संगणक आणि अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा कचरा आपल्याकडे वाढतोच आहे. प्रगत देश असा कचरा तिसऱ्या जगातील देशांमध्ये निर्यात करून मोकळे होतात, तर आपल्याकडे त्या कचऱ्यातून सोने-चांदी वेगळे करण्याचे घातक व्यवसाय चालविले जातात. ही प्रक्रिया आपल्याला अत्यंत घातक अशा भविष्याकडे घेऊन जात आहे.
No comments:
Post a Comment