बोपखेल व खडकी जोडण्यासाठी मुळा नदीवर उभारण्यात येणार्या पुलासाठी लागणार्या जागेच्या बदल्यास संरक्षण विभागाने 26 कोटींची मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे केली आहे. मात्र, ही रक्कम भरण्यास पालिका प्रशासन उत्सुक नाही. सदर रक्कम माफ करण्याबाबतचे विनंती पत्र पालिकेने संरक्षण विभागास पाठविले आहे. मात्र, संरक्षण विभागाने त्यास अनुकूल नाही. त्यामुळे पुल उभारणीस विलंब होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

No comments:
Post a Comment