Tuesday, 8 May 2018

ई-कचऱ्याचे जीवघेणे डोंगर (भाग- २ )

संपूर्ण जग आज विकास या एकाच शब्दाच्या मागे धावत सुटले आहे. संगणक आणि मोबाइल फोनसारख्या उपकरणांनी आपले जीवन बरेच सुविधाजनक बनविले आहे. फॅक्‍स मशीन, झेरॉक्‍स मशीन, डिजिटल कॅमेरे, लॅपटॉप, इलेक्‍ट्रॉनिक खेळणी आणि गॅजेट्‌स, एअर कंडिशनर, मायक्रोवेव्ह ओव्हन, इलेक्‍ट्रॉनिक थर्मोमीटर अशा वस्तूंनी आपले आयुष्य घेरले गेले आहे. ही यादी आणखीही बरीच मोठी आहे. परंतु या सर्व वस्तूंचा सुखसोयी म्हणून वापर करताना त्यापासून निर्माण होऊ घातलेल्या धोक्‍याबद्दल संभ्रम कायम आहे. ही उपकरणे जेव्हा जुनी होतील आणि वापरातून बाद होतील, तेव्हा ई-कचऱ्याची समस्या अक्राळविक्राळ रूप धारण करेल, यात बिलकूल शंका नाही. ही समस्या भारत, चीन यांसारख्या तिसऱ्या जगातील देशांसाठी अधिक गंभीर आहे, कारण अमेरिका, ब्रिटन यांसारख्या विकसित देशांवर या कचऱ्याचा फारसा परिणाम झाल्याचे दिसत नाही.

No comments:

Post a Comment