Thursday, 5 July 2018

ज्ञानप्रबोधिनी शाळेतील गुरुकुल विभागाच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात नोंदवला सहभाग

भारत विकास परिषदेतर्फे नैसर्गिक शिक्षण संस्थेत वृक्षारोपण
विद्याथ्यार्र्ंना लागते पर्यावरणाची गोडी

लोणावळाः भारत विकास परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेच्यावतीने मळवली मधील नैसर्गिक शिक्षण संस्थेत वृक्षारोपण करण्यात आले. नैसर्गिक शिक्षण संस्थेच्या आवारात जांभूळ, पिंपळ, करंज, वड, आंबा आणि काही जंगली वनस्पतींची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला भारत विकास परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेचे सभासद सहकुटुंब उपस्थित होते. तसेच निगडी प्राधिकरण येथील ज्ञानप्रबोधिनी शाळेतील गुरुकुल विभागाच्या विद्यार्थ्यांनी देखील या उपक्रमात सहभाग नोंदवला. त्यामुळे विद्यार्थ्यांना पर्यावरणाची गोडी निर्माण होते आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना झाडांचे महत्व समजते. झाडे नसतील तर आपण कसे जगणार, हे त्यांना सोप्या भाषेत मार्गदर्शन केले जाते.

No comments:

Post a Comment