Friday, 20 July 2018

पिंपरी-चिंचवड महापालिकेची पहिली शिक्षण समितीची बैठक; महिन्याच्या पहिल्या व तिसर्‍या शनिवारी ‘दप्तरविना शाळा’ उपक्रम

कारगील विजय दिवस साजरा केला जाणार  
महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसर्‍या शनिवारी ‘दप्तरविना शाळा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्या दिवशी मास पी. टी, ग्रंथ प्रदर्शन, वाचन, व्याख्यान, कविसंमेलन असे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिकेच्या शिक्षण समितीच्या गुरूवारी (दि.19) झालेल्या पहिल्या सभेत अध्यक्षस्थानी प्रा. सोनाली गव्हाणे होत्या. पालिकेच्या एकूण 105 प्राथमिक शाळा आहे. त्यामध्ये मराठी माध्यमाच्या 87, उर्दू माध्यमाच्या 14, हिंदी माध्यमाच्या 2 आणि इंग्रजी माध्यमाच्या 2 शाळा आहेत. पहिली ते सातवीची विद्यार्थी संख्या एकूण 37 हजार 973 आहे.

No comments:

Post a Comment