महापालिका प्रदर्शनाद्वारे करणार शहरात जनजागृती
17 ते 19 ऑगस्ट दरम्यान ऑटो क्लस्टरमध्ये पार पडणार
चिंचवड : घनकचरा व्यवस्थापन, तंत्रज्ञानाविषयी व्यावसायिकांसह नागरिकांमध्ये जागरूकता वाढावी, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत चिंचवड येथील ऑटो क्लस्टर प्रदर्शन हॉलमध्ये 17 ते 19 ऑगस्ट या कालावधीत प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. पिंपरी महापालिकेमार्फत सर्व गृहनिर्माण संस्था, हॉटेल व्यवसाय, मंगल कार्यालय, खाणावळ, हॉस्टेल, उपाहारगृह, शाळा-महाविद्यालये, भाजी मंडई आणि कृषी बाजार समिती यांच्यात कचरा व्यवस्थापन, तंत्रज्ञानाविषयी जागरूकता वाढविण्यात येत आहे. तसेच नागरिक, व्यावसायिकांमध्ये कचर्यावर प्रक्रीया करणे ते रिसायकलिंग करणे, त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment