पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणार्या शहरातील गेल्या 6 वर्षांपासून रखडलेल्या दापोडी-निगडी या दुहेरी जलदगती बस मार्गास (बीआरटीएस) मुंबई उच्च न्यायालयाने अखेर ‘हिरवा कंदील’ दिला आहे. त्यामुळे येत्या 10 दिवसांमध्ये 25 किलोमीटर अंतराच्या मार्गावर जलद गतीने बससेवा सुरू करण्यात येणार आहे, असे महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार व पालिकेचे प्रवक्ते विजय भोजने यांनी दावा केला आहे. परंतु; हा मार्ग ज्या पुणे-मुंबई महामार्गावरून जातो त्या मार्गावरच सध्या पुणे मेट्रोचे काम सुरू असून हे काम सुरू असताना आत्तापर्यंत मेट्रो व महापालिकेत कुठलाही योग्य समन्वय नसल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. त्यामुळे हा देशातील पहिला दुहेरी ‘बीआरटी’ मार्ग ठरणार असल्याचे कौतुक असले तरी या संस्थांमधील समन्वयाअभावी त्याची अडथळ्यांची शर्यत खरेच थांबणार का, हा खरा सवाल आहे.
No comments:
Post a Comment