औदयोगिक चाकण परिसरातून जाणार्या नदी पात्रात मोठ्या प्रमाणात होते प्रदुषण
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीने केली पाहणी
चाकण : गेल्या अनेकवर्षांपासून प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे पर्यावरण अभ्यासक औदयोगिक नगरी व शहरवासियांची जीवनदायिनी असलेल्या इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबत प्रबोधन व जागरूकता आणण्याचे काम करीत आहेत. यामुळे मावळ, देहू आळंदी परिसरातील नागरिक बर्यापैकी इंद्रायणी स्वच्छतेबाबत जागरुक झाल्याचे मागील दोन वर्षांमध्ये दिसून आले. परंतु औदयोगिक चाकण परिसरातून जाणार्या नदी पात्रातील ठिकाणी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे औदयोगिक घातक रासायनिक कचरा नदीतील पाण्यात मिसळत आहे. समिती पर्यावरण विभाग सदस्य विजय पाटील, विजय मुनोत, मोहन भोळे, संतोष चव्हाण, बाबासाहेब घाळी यांनी चाकण इंद्रायणी नदी परिसरात पाहणी केली असता खालील महत्वपूर्ण बाबी निदर्शनास आल्या.
No comments:
Post a Comment