पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात समावेश झाल्यानंतरची परिस्थिती
मनुष्यबळाबाबत अजुनही घडी बसलेली नाही
देहूरोड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात ग्रामीणमधील देहूरोड, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी आणि चाकण ही चार पोलीस ठाणी समाविष्ट करण्यात आली आहेत. स्वातंत्र्यदिनी आयुक्तालयाचा स्वतंत्र कारभार सुरू झाला. त्यामुळे या चार पोलीस ठाण्यांचे कामकाजही आयुक्तालयांतर्गत सुरू झाले. पण पाच दिवसांनंतरही या पोलीस ठाण्यांना ग्रामीणची वाहने वापरावी लागत आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरू झाल्यानंतर देहूरोड, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी आणि चाकण या पोलीस ठाण्यांचे कामकाज नव्या आयुक्तालयांतर्गत सुरू झाले. पोलीस ठाण्यातील संदेश आयुक्तालयाच्या कंट्रोलला जाऊ लागले. पण इतर सुविधा आणि मनुष्यबळाबाबत अजुनही या पोलीस ठाण्यांची घडी बसली नसल्याचे चित्र आहे. पोलीसांना पुर्वीची ग्रामीणचीच पोलीस वाहने वापरावी लागत आहेत. ग्रामीणकडून देण्यात आलेली अतिरिक्त वाहने, बीट मार्शलची वाहने काढून घेण्यात आली आहेत. अयुक्तालयाकडून पोलिसांना नव्या वाहनांची प्रतिक्षा आहे.
No comments:
Post a Comment