पिंपरी - हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान नियोजित मेट्रोचे काम सुरू होण्याअगोदर या भागातील वाहतूक कोंडी फोडावी लागणार आहे. त्यासाठी प्रस्तावित तीन रस्त्यांचे काम पीएमआरडीएने करावे, अशी अपेक्षा हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशनने केली आहे. या रस्त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर शिवाजी चौकात होणारी कोंडी पूर्णपणे फुटणार असल्याचे असोसिएशनचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर कर्नल चरणजितसिंग भोगल (निवृत्त) यांनी ‘सकाळ’ला सांगितले.
No comments:
Post a Comment