पिंपरी - शहरातील विविध रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूने दोघांचा मृत्यू झाला; तर स्वाइन फ्लूबाधित २३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील ४ रुग्ण कृत्रिम श्वासोच्छवासावर आहेत. अजमेरा कॉलनी येथील ५२ वर्षीय पुरुषाचा सोमवारी स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. त्यांना २४ ऑगस्टला उपचारासाठी थेरगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांना पिंपरीतील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. शनिवारपासून (ता. १) ते कृत्रिम श्वासोच्छवासावर होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वाल्हेकरवाडीतील ३२ वर्षीय तरुणाचा शनिवारी स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. त्यांना निगडी येथील खासगी रुग्णालयात ३१ ऑगस्टला उपचारासाठी दाखल केले होते. तेव्हापासूनच ते कृत्रिम श्वासोच्छवासावर होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या स्वाइन फ्लूबाधित २३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ३५ रुग्णांना उपचार करून सोडण्यात आले; तर ११ जणांचा आतापर्यंत स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे.
No comments:
Post a Comment