राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत महापौर राहुल जाधव, पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर आदी मान्यवरांनी सहभाग घेतला. या स्वच्छता मोहिमेअंतर्गत सुमारे दोन टन कचरा गोळा करण्यात आला.

No comments:
Post a Comment