इंद्रायणी नदीला वेध जलपर्णी मुक्तीचे
आळंदी : पिंपरीचिंचवड महापालिकेच्या हद्दीतून इंद्रायणी नदीचे होत असलेले प्रदूषण थांबविण्यासह नद्याचे प्रवाह वाहते ठेवण्यासाठी मोशी नंतर आता डुडुळगावमध्ये नदीतील जलपर्णी काढण्यास स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी काम सुरु केले आहे. यावेळी डुडुलगाव येथील नदीतुन जलपर्णी नदी बाहेर काढली. अविरत श्रमदान, सायकल मित्र, महेशदादा स्पोर्टस आणि डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, रानजाई प्रकल्प देहू, डुडुळगाव ग्रामस्थ यांनी पुढाकार घेतला. यावेळी प्रमुख सोमनाथ आबा मुसुडगे, सचिन भैय्या लांडगे यांचे मार्गदर्शन झाले. सचिन भैय्या लांडगे, नगरसेवक विजय मामा लांडे, योगेश तळेकर, सोमनाथ आबा मुसुडगे आदीं उपस्थित होते. मोशीनंतर आता डुडुळगाव घाटावर काम करण्यात आले. असेच काम इतरत्र देखिल करण्यात येणार आहे. नदीचे दुतर्फा राहणार्या नागरिकांनी या अभियानात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment