पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळी आणि भोजनालयांचा सुळसुळाट झाला आहे. काही भोजनालये रस्त्याच्या कडेला रात्रीही सुरू असतात. तेथील अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अशा अनधिकृत खानावळी आणि भोजनालयांवर कारवाई करणे मनुष्यबळाअभावी शक्य होत नसल्याचे अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


No comments:
Post a Comment