Sunday, 9 December 2018

‘उन्नती’ फाऊंडेशनकडून पालिका शाळेतील 1296 विद्यार्थ्यांचा मोफत अपघाती विमा

अपघाती विम्यात अपघात झाला तर 25 हजार रूपयापर्यंत रुग्णालयातील खर्च मिळणारसुमारे 38 कोटी 88 लाख रूपये एवढे मिळणार विमा संरक्षण
पिंपरी चिंचवड : पिंपळे सौदागर येथील महापालिकेच्या आण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालयातील 1296 विद्यार्थी व प्रत्येकी एक पालकांचा अपघाती विमा काढण्यात आला आहे. उन्नती सोशल फाऊंडेशनच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला असून सुमारे 38 कोटी 88 लाख रूपये एवढे विमा संरक्षण मिळणार आहे. उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, संस्थापक संजय भिसे यांनी अपघाती विमा पॉलिसी माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी पराग मुंडे यांच्याकडे सुपूर्त केली.

No comments:

Post a Comment