आकाशचिन्ह व परवाना विभागाने जाहिरात होर्डिंगसंदर्भात नवे धोरण तयार केले आहे. त्यास विधी समितीने मंजुरी देऊन सर्वसाधारण सभेकडे शिफारस केली आहे. सभेच्या अंतिम मंजुरीनंतर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाणार आहे. या धोरणात जाहिरात होर्डिंगसह झाडांवरील जाहिरातवर निर्बंध घालण्यात आले आहेत. या धोरणामध्ये जाहिरात होर्डिंगचे बांधकाम व लोखंडी फ्रेमचा दर्जा व मजबुतीकरण (संरक्षण स्थिरता प्रमाणपत्र) तपासला जाणार आहे. शहरात कोणत्या जागेवर होर्डिंग लावता येणार आणि नाही. या संदर्भात निश्चिती केली आहे. पालिकेच्या जागेतील होर्डिंग निविदा काढून भाडेतत्त्वावर दिल्या जाणार आहेत.
No comments:
Post a Comment