Saturday, 9 March 2019

संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत 24 जणांना पेन्शन मंजुरी पत्र वाटप

पिंपरी –  जागतिक महिला दिनानिमित्त संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत २४ विधवा, अपंग व वयोवृद्ध नागरिकांना पेन्शन मंजूरीची पत्रे पिंपरी येथे वाटप करण्यात आली. आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांच्या हस्ते ही पत्रे वाटप करण्यात आली. पिंपरी विधानसभा मतदारसंघातील विधवा १४, अपंग ५, वयोवृद्ध ५ अशा एकूण २४ जणांचा पेन्शन मंजूर झालेल्यांमध्ये समावेश आहे.

No comments:

Post a Comment