पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) 2019-20 या आर्थिक वर्षातील 1 हजार 722 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात प्रामुख्याने रिंगरोड, नदी सुधार व पाणीपुरवठा योजना, टीपी स्कीमधील विकास कामे, पूल रस्ते यांसोबत हायपरलूपसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. “पीएमआरडीए’च्या विकासाला या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून चालना मिळणार आहे. शहराच्या विकासाच्या दृष्टीने पायाभूत सुविधा व आर्थिक विकासाचा वेग वाढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment