पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड शहरात विनाकारण घराबाहेर चालत, वाहनातून फिरणा-या 117 जणांवर बुधवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संचारबंदी सुरु असताना नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. केवळ जीवनावश्यक वस्तू आणि सेवा यांचा पुरवठा नियमितपणे सुरु आहे. त्यासाठी नागरिकांना घराबाहेर पडता येईल. घरातील केवळ एका व्यक्तीने घराबाहेर पडून जीवनावश्यक वस्तू खरेदी कराव्यात. हे करत असताना देखील नागरिकांनी सामाजिक अंतर राखणे बंधनकारक आहे. प्रशासनाला एकाच ठिकाणी गर्दी आढळून आल्यास त्यांच्यावर देखील योग्य ती कारवाई केली जात आहे.
No comments:
Post a Comment