मुंबई : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव आणि संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सेल्फ असेसमेंट (स्व-चाचणी) टूल बनवले आहे. प्राथमिक पातळीवर कोरोनाची लक्षणे ओळखण्यासाठी या टूलचा उपयोग होतो. हे टूल सर्वांसाठी https://covid-19.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध असून वैद्यकीय सल्ला हवा असेल तर आवश्यक ती माहिती आणि संपर्क क्रमांकही या लिंकवर उपलब्ध आहे. दिवसेंदिवस कोरोना संक्रमितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हे संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आल्याचे सांगितले आहे.
No comments:
Post a Comment