Tuesday, 14 April 2020

अन्नाच्या शाेधात माेर शहरात

  • नागरिकांकडून जीवनदान ः मदतीसाठी धावले प्राणीमित्र
पिंपरी – करोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे. पर्यायाने, आता रस्त्यांवर भटक्‍या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. आज तर, चक्क पिंपरीत नागरिकांना मोराचेच दर्शन घडले. घाबरलेल्या स्थितीत असलेल्या या मोराला पाणी व अन्न देऊन नागरिकांनी प्राणीमित्र विनायक बडदे यांच्या हवाली केले. संबंधित मोराला वन विभागाकडे (पुणे) सुपूर्द करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment