Monday, 5 March 2018

सोशल मीडिया पर लहराया लांडगे समर्थको की बगावत का परचम

हमारी पार्टी सिर्फ और सिर्फ विधायक महेश लांडगे ही के पोस्ट वायरल
पिंपरी। स्थायी समिति अध्यक्ष पद के चुनाव से पिम्परी चिंचवड मनपा की सत्ताधारी भाजपा दोफाड़ की कगार पर खड़ी है। अपने समर्थक को दरकिनार किये जाने से भोसरी के विधायक महेश लांडगे खासे तौर पर नाराज हैं। हालांकि उन्होंने अब तक बीती दोपहर से मचे घमासान पर कोई भूमिका स्पष्ट नहीं की है, मगर उनके समर्थकों ने सोशल मीडिया पर बगावत का परचम लहरा दिया है। हमारी पार्टी सिर्फ और सिर्फ विधायक महेश लांडगे ही हैं, इस आशय के पोस्ट सोशल मीडिया पर वायरल हो रहे हैं। ये पोस्ट सत्ताधारी भाजपा के लिए सीधे सीधे तौर पर चुनौती मानी जा रही है।

स्वयंपाकावेळी मोबाईल व टीव्ही बघणे टाळा

आज मोबाईलवर बोलत किंवा टीव्हीवरील मालिका बघत बघत स्वयंपाक करण्याचे महिलांमधील प्रमाण खूप वाढले आहे. मात्र, महिलांची ही सवय संपूर्ण घरासाठीच धोकादायक ठरू शकते. कारण, मोबाईल किंवा टीव्ही पाहत स्वयंपाक करत असताना दुर्लक्ष होऊन आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महिलांनी मोबाईल आणि टीव्ही या दोन गोष्टी स्वयंपाकघरापासून दूर ठेवाव्यात, असे आवाहन सेफ किड्स फाऊंडेशनच्या अधिकार्‍यांनी केले आहे.

शाळकरी मुले ओढतात ई-सिगारेटचे झुरके

दारूचे घोट रिचवणे, सिगारेटचे झुरके घेणे हे महाविद्यालयीन तरुणांचे ‘स्टेटस सिम्बॉल’ बनत असताना हीच नकारात्मक क्रेझ  शाळकरी अल्पवयीन मुलांमध्येही वाढत आहे.  पुण्याच्या मध्यवस्तीतील काही नामांकित शाळांत शिकणार्‍या 40 ते 45  मुलांच्या दप्‍तरात ‘इलेक्ट्रॉनिक्स सिगारेट’ अर्थात मोबाईल हुक्का (ई-सिगारेट) सापडल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  विशेष म्हणजे धूम्रपानाचा आधुनिक प्रकार असलेल्या या ई-सिगारेट्स टपर्‍या, स्टेशनरी दुकाने आणि ऑनलाईन पद्धतीने सहजरीत्या उपलब्ध होत आहेत.  शाळकरी मुले व्यसन म्हणून नव्हे तर ‘फॅशन’ म्हणून या ई-सिगारेटचे झुरके घेत आहेत, हे लक्षात आल्यावर शाळा प्रशासन व संबंधित पालकांनी व्यसनमुक्ती केंद्राकडे धाव घेतली आहे.    

मिरवणुकीचा खर्च टाळून काळूबाई प्रतिष्ठानची अनोख्या उपक्रमाद्वारे शिवजयंती साजरी

पिंपरी (Pclive7.com):- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीच्या खर्चाला आळा घालून वाचलेल्या रक्कमेतून गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणासाठी ही रक्कम खर्च करण्याचा स्तुत्य उपक्रम पिंपरी चिंचवडमधील काळेवाडी येथील शिवसेनाप्रणित काळूबाई प्रतिष्ठानने राबविला आहे.

“माझ्या पक्षाचं नाव दमदार आमदार महेश लांडगे”, सोशल मिडियावर समर्थकांकडून ‘असंतोष’ व्यक्त!

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप समर्थक ममता गायकवाड यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केली. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे निकटवर्तीय राहुल जाधव यांना डावलून ही निवड करण्यात आली. या निवडीवरून सत्तेत असलेल्या भाजपमध्ये प्रचंड नाराजीनाट्य घडले. लांडगे समर्थक असलेल्या महापौर नितीन काळजे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. तर राहुल जाधव यांनी थेट स्थायीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. स्थायीच्या अध्यक्षपदी राहुल जाधव हे प्रबळ दावेदार असताना झालेल्या या घडामोडीमुळे लांडगे समर्थकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. सोशल मिडीयावरून समर्थकांनी सत्ताधारी भाजपच्या कार्यपध्दतीवर टिका करत महेश लांडगेंची जोरदार पाठराखण केली आहे.

सोशल मिडीयासारख्या प्रभावी व जलद माध्यमातून राष्ट्रवादीचे विचार घरोघरी पोहचवा – संजोग वाघेरे

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची सर्व नागरिकांना बरोबर घेऊन काम करण्याची भूमिका आहे. मात्र, आदरणीय लोकनेते शरद पवार यांचे विचार लोकांपर्यंत पोहचविण्याबाबत कार्यकर्ते कमी पडले. विरोधकांच्या खोट्या भूलथापा व आश्वासनांना मतदार भुलले. त्यामुळे राष्ट्रवादीला सत्ता गमवावी लागली. पुढील काळात खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांसह जास्तीत जास्त नागरिकांना सोशल मिडीया वापरण्याबाबत जनजागृती शिबीरे आयोजित करण्यात येतील. त्याचा लाभ घ्यावा व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे विचार सोशल मिडीयासारख्या प्रभावी व जलद माध्यमातून घरोघरी पोहचवावेत असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केले.

मोशी उपबाजारात भाजीपाल्याचे भाव घटले

पिंपरी – मोशीतील नागेश्‍वर महाराज उपबाजारात भाजीपाल्याची आवक वाढली झाली असून, भाव देखील घटले आहेत. फळभाज्यांची एकूण आवक 996 क्विंटल झाली असून, पालेभाज्यांची आवक 36 हजार 505 गड्डया एवढी झाली आहे. फळभाज्यांची आवक 100 क्विंटलने; तर पालेभाज्यांची आवक किरकोळ 4 हजार 775 गड्ड्यांनी वाढली. पालेभाज्यांच्या किंमती मात्र स्थिर आहेत. आले व कोबीची आवक वाढली आहे.